Tuesday, 24 January 2017

जी-आठ : वैश्विक आव्हानांना चर्चा कृती यांद्वारे सामोरे जाण्यासाठी स्थापन झालेला अनौपचारिक पण सशक्त असा आठ राष्ट्रांचा दबाव गट. या गटाला स्थायी कार्यालय नाही, तसेच स्थायी कर्मचारी वर्ग नाही किंवा अंदाजपत्रक नाही. सुरुवातीला १९७५ मध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ग्रेट ब्रिटन अमेरिकेची संयुक्ते संस्थाने या सहा औद्योगिक देशांनी त्याची स्थापना राँब्यूए (फ्रान्स) या गावी केली. पुढे कॅनडा हा देश सॅन वॉन (प्वेर्त रीको) येथील १९७६ च्या परिषदेत या गटात सामील झाला आणि बर्मिंगहॅम (ग्रेट ब्रिटन) येथील 1998 च्या परिषदेत रशिया या गटात आला. रशियाच्या समावेशानंतर या संघटनेची जी-आठदेश अशी ओळख तयार झाली.

हा अतिशय प्रभावशाली असा गट आहे. सन २००५ मध्ये ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सच्या पुढाकाराने या गटाचा आणखी विस्तार करण्यात आला. भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको ब्राझील या पाच विकसनशील देशांनाही या अनौपचारिक गटात सहभागी करून घेण्यात आले. या देशांच्या समावेशानंतर जी-आठ + पाच’ असे या संघटनेला ओळखण्यात येऊ लागले. या संघटनेचे अध्यक्षपद दरवर्षी एका सदस्य देशाकडे असते. वर्षारंभी अध्यक्ष निवडलेले सदस्य राष्ट्र त्या त्या वर्षांतील उपक्रमांचे संयोजन शिखर परिषदेचे आयोजन करते.

गेल्या काही वर्षांत जी-आठ परिषदांमधून पर्यावरणावर प्रामुख्याने विचारविनिमय झाला. या गटातील प्रबळ औद्योगिक देशांमधील लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या फक्त १४ टक्के आहे. मात्र एकूण जागतिक उत्पन्नाच्या ६५ टक्के उत्पन्न या देशांमधून निर्माण होते. जगाच्या एकूण ऊर्जेपैकी अर्ध्या ऊर्जेचा वापर हेच देश करतात. सर्वांत जास्त खनिजतेल हेच औद्योगिक देश वापरतात. या आठ देशांचा एकूण लष्करी खर्च जगातील एकूण लष्करी खर्चाच्या ७२ टक्के इतका आहे. या आठपैकी चार देशांकडे ९५ टक्के अण्वस्त्रसाठा आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन याच देशांकडून मोठ्या प्रमाणात होते. तथापि विकसित देशांनी २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जनात ८० टक्के कपात करावी आणि उर्वरित जगाने या कालावधीत कार्बनचे उत्सर्जन ५० टक्क्यांनी कमी करावे, असे जी-आठ देशांनी सुचविले आहे. भारत चीन या देशांत झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे जागतिक प्रदूषणात भर पडत असल्याचे निर्देश या विकसित राष्ट्रांनी दिले आहेत.

जी-आठबरोबर राहिल्याने भारताला दहशतवादाविषयी वाटत असलेली चिंता या व्यासपीठावरून मांडता आली त्याचे गांभीर्यही पटवून देता आले, हे या दबाव गटाचे वैशिष्ट्य होय.

स्त्रोत --- मराठी विकिपिडीया वरून

Thursday, 19 January 2017

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.

जीवन

मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर माजासे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

अभय साधक

१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यानी बाबांना 'अभय साधक' अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.[१]

आनंदवन

बाबा आमटे
तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला[२]. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.[३]. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा ‘देखणा प्रत्यय’ या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण-संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणारे नद्या-नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवार्‍याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.
भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.
सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्‍नी श्रीमती साधना आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्‍या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.
बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.
एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती.[संदर्भ द्या] गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते.[संदर्भ द्या]
संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित रहात असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली.
फेब्रुवारी ९, इ.स. २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत.

कार्य

इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमट्यांनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापल्या :
बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत जोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटेविकास आमटे, त्यांच्या सुना व नातू आमट्यांनी आरंभलेले कार्य पुढे नेत आहेत.

साहित्य

बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत 
  • 'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
  • 'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
  • 'माती जागवील त्याला मत'
बाबा आमटे यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके 
  • आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे [५]
  • मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक : विलास मनोहर
  • बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)
  • बाबा आमटे (चरित्र, लेखक भ.ग. बापट)

पुरस्कार

आंतरराष्ट्रीय

भारतीय

  • पद्मश्री इ.स. १९७१
  • पद्मविभूषण इ.स. १९८६
  • अपंग कल्याण पुरस्कार इ.स. १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुलॆ पुरस्कार इ.स. १९९८
  • गांधी शांतता पुरस्कार इ.स. १९९९
  • सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९९९
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) १ मे, इ.स. २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
  • मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार इ.स. १९८५
  • पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार इ.स. १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार इ.स. १९७४
  • राष्ट्रीय भूषण पुरस्कार इ.स. १९७८
  • जमनालाल बजाज पुरस्कार इ.स. १९७९
  • एन डी दिवाण पुरस्कार इ.स. १९८०
  • राजा राम मोहनराय पुरस्कार इ.स. १९८७
  • भरतवास पुरस्कार इ.स. २००८
  • जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९८८
  • महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इ.स. १९९१
  • कुमार गंधर्व पुरस्कार इ.स. १९९८
  • जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक इ.स. १९९८
  • डी.लिट - नागपूर विद्यापीठ इ.स. १९८०
  • डी. लिट. - पुणे विद्यापीठ, इ.स. १९८५-८६
  • देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) इ.स. १९८८ -विश्वभार
  • स्त्रोत -----मराठी विकिपिडिया वरून साभार

Wednesday, 18 January 2017

राज्य/प्रदेश प्रशासकीय. अधिवेशनीय. न्यायालीन. पासून पूर्व राजधानी
अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेर कोलकाता १९५६
आंध्र प्रदेश हैदराबाद हैदराबाद हैदराबाद १९५६ कुर्नुल[१]
अरुणाचल प्रदेश इटानगर इटानगर गुवाहाटी १९७२
आसाम गुवाहाटी दिसपूर गुवाहाटी १९७२ शिलॉँग[२] (१८७४-१९७२)
बिहार पटना पटना पटना १९३६
चंदिगढ चंदिगढ[३] चंदिगढ १९६६
छत्तिसगढ रायपुर रायपुर बिलासपुर २०००
दादरा आणि नगर-हवेली सिल्वासा मुंबई १९६१
दमण आणि दीव दमण मुंबई १९८७
दिल्ली दिल्ली दिल्ली दिल्ली १९५६
गोवा पणजी[४] परवरी मुंबई १९६१
गुजरात गांधीनगर गांधीनगर अमदावाद १९७० अमदावाद (१९६०-१९७०)
हरियाणा चंदिगढ चंदिगढ चंदिगढ १९६६
हिमाचल प्रदेश शिमला शिमला शिमला १९४८
जम्मू आणि काश्मीर • श्रीनगर (उ)
• जम्मू (हि)
• श्रीनगर (उ)
• जम्मू (हि)
श्रीनगर १९४८
झारखंड रांची रांची रांची २०००
कर्नाटक बेंगलूरू बेंगलूरू बेंगलूरू १९५६ मैसूर
केरळ तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम एर्नाकुलम १९५६ कोची[५] (१९४९-१९५६)
लक्षद्वीप कवरत्ती एर्नाकुलम १९५६
मध्य प्रदेश भोपाळ भोपाळ जबलपुर १९५६ नागपूर[६] (१८६१-१९५६)
महाराष्ट्र मुंबई[७]
• नागपूर (हि/२रे)[८]
• मुंबई (उ)
• नागपूर (हि)[९]
मुंबई १८१८
१९६०
मणिपूर इम्फाल इम्फाल गुवाहाटी १९४७
मेघालय शिलॉँग शिलॉँग गुवाहाटी १९७०
मिझोरम ऐझॉल ऐझॉल गुवाहाटी १९७२
नागालँड कोहिमा कोहिमा गुवाहाटी १९६३
ओडिशा भुवनेश्वर भुवनेश्वर कटक १९४८ कटक (१९३६-१९४८)
पुडुचेरी पुडुचेरी पुडुचेरी चेन्नई १९५४
पंजाब चंदिगढ चंदिगढ चंदिगढ १९६६ • लाहोर[१०] (१९३६-१९४७)
• शिमला (१९४७-१९६६)
राजस्थान जयपूर जयपूर जोधपुर १९४८
सिक्किम गंगटोक[११] गंगटोक गंगटोक १९७५
तमिळनाडू चेन्नई चेन्नई चेन्नई १९५६
त्रिपुरा अगरतला अगरतला गुवाहाटी १९५६
उत्तर प्रदेश लखनौ लखनौ अलाहाबाद १९३७
उत्तराखंड देहरादून[१२] देहरादून नैनिताल २०००
पश्चिम बंगाल कोलकाता कोलकाता कोलकाता १९०५
  1. आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिलुन बनला आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.
  2. आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉँग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.
  3. चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.
  4. इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे त्यावेळी ते पुर्तगालकडे होता.
  5. कोची हे त्रवणकोर-कोचीनची राजधानी होती, ते १९५६ साली नविन स्थापीत केरळ राज्याचा भाग झाला.
  6. १८६१पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ते मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरार व विदर्भ बोंम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर ना राहल्याने १९६० साली ते महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली..
  7. इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई (बोंम्बे) हे बोंम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बोंम्बे राज्याची राजधानी झाली. हे बोंम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजीत झाले.
  8. ‍‍इ.स. १९६० सालच्या नागपूर तहा प्रमाणे नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.
  9. नागपूर तहा प्रमाणे दरवर्षी एक विधानसभा अधिवेशन घेण्यात येईल. हे अधिवेशन खास विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राहवे म्हणुन.
  10. १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.
  11. इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्किमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्किम भारतात सामील झाले
      1. देहरादून ही उत्तराखंडची चालू राजधानी आहे. गैरसैण प्रस्थावित राजधानी आहे.         स्त्रोत -विकिपिडीया मराठी