वादग्रस्त विधाने करून नेहमीच खळबळ उडवून देणारे भाजपचे खासदार साक्षी
महाराज यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे. उत्तर प्रदेश निवडणुका होऊ
घातल्या आहेत. त्यापूर्वीच लोकसंख्यावाढीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
लोकसंख्यावाढीला एक विशेष धर्मच जबाबदार आहे, असे वक्तव्य करून
अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजावर आरोप केला आहे. देशात वाढत्या लोकसंख्येमुळे
अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्याला हिंदू जबाबदार नाहीत. चार पत्नी आणि
४० मुले असलेले त्यास जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले. मेरठमधील एका
जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
हिंदू असो वा मुस्लिम माता, त्यांचा सन्मान ठेवायलाच हवा, असे साक्षी महाराज म्हणाले. चार विवाह आणि ‘तीन तलाक’ प्रथेवरून जोरदार टीका केली. ‘तीन तलाक’ या प्रथेला समूळ नष्ट करण्याची वेळ आली आहे. सर्वांसाठी समान कायदा बनवण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी त्यांनी राम मंदिराचा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र, साक्षी महाराजांनी राम मंदिराचा मुद्दा हा भाजपऐवजी साधू-संतांचा असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांनी आपल्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन करत आपण कोणत्याही एका विशिष्ट समाजाविषयी बोललो नाही, अशी प्रतिक्रिया ‘सीएनएन न्यूज १८’ जवळ व्यक्त केली. मी कोणत्याही समाजाविषयी बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. असे काही असेल तर निवडणूक आयोगाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
साक्षी महाराज यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप नेते अशा प्रकारची धर्मविरोधी विधाने करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी केली आहे. भाजपने साक्षी महाराज यांना पक्षातून निलंबित करावे आणि संसद सदस्यत्त्वही रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही साक्षी महाराजांवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच भडकाऊ भाषणबाजी केली जाते, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, साक्षी महाराज यांनी यापूर्वीही अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अलिकडेच त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हिंदू नसून, राजकारणातील पप्पू असल्याची टीका केली होती.

No comments:
Post a Comment